आज पारसी (Parsi) समुदायाचा नवीन वर्ष मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस श्रद्धेचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. नवरोज (Nowruz) हा दोन पारशी शब्द नव आणि रोज मिळून बनला आहे. याचा अर्थ आहे नवा दिवस. ह्या दिवसापासून पारसी समुदाय नवीन वर्षाची सुरुवात करतात. ह्या दिवसाला नौरोज, जमशेदी नवरोज , पतेती अशा नावानेही ओळखले जाते. नवरोज साजरा करण्याचे कारण आणि पारशी समाजाचे लोक हा सण कसा साजरा करतात ते जाणून घेऊया.
पारशी समाजाकडून गेल्या तीन हजार वर्षांपासून नवरोज साजरा केला जातो. पर्शियाचा (Persia) राजा जमशेद (Jamshed) यांच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. योद्धा जमशेद याने झोरोस्ट्रियन कॅलेंडरची (Zoroastrian calendar) स्थापना केली असे मानले जाते. यासोबतच त्यांनी या दिवशी सिंहासन ग्रहण केले. तेव्हापासून नवरोज हा सण साजरा केला जातो. दुसरीकडे, ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार (Gregorian calendar) , हा सण वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो, जेव्हा रात्र आणि जिन दोन्ही समान असतात.
अशा प्रकारे नवरोज सण साजरा केला जातो
ह्या दिवशी पारसी लोक सकाळी लवकर उठून विविध प्रकारचे पदार्थ बनवतात. ते पदार्थ त्याच्या जवळच्या आणि मित्रांमध्ये वाटतात. यासोबतच एकमेकांना भेटवस्तू देतात. या दिवशी भेटवस्तू देण्याबरोबरच राजा जमशेदची पूजा केल्याने घरामध्ये नेहमी आनंद राहतो, असे मानले जाते. पारशी मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना सभा घेतल्या जातात. यासोबत गेल्या वर्षी जे काही मिळाले त्यासाठी देवाचे आभार मानतात.