लोकशाही स्पेशल

Rajmata Jijabai Punyatithi charolya in marathi : राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठीत चारोळ्या

छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन आणि पराक्रमाचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी 17 जून रोजी आहे.

Published by : Siddhi Naringrekar

Rajmata Jijabai Punyatithi charolya in marathi : छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन आणि पराक्रमाचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी 17 जून रोजी आहे. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला होता.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त मराठीत चारोळ्या

पहिली चारोळी

जिजाऊ आई, पूर्वजन्माची पुण्याई असावी,

जन्म जो तुझ्या गर्भात शिवबांनी घेतला,

जग पाहिल जरी नव्हतं तरी,

नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.

दुसरी चारोळी

आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी,

जिजाऊ महान माता होती,

जगातील प्रत्येक स्त्री ने आदर्श घ्यावा,

अशी आदर्श माता होती.

तिसरी चारोळी

जिजाऊ एक स्त्री होती,

शहाजी राजांची वीर पत्नी होती,

जाधव घराण्याची लाडकी लेक होती,

स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती.

चौथी चारोळी

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते लढले मावळे,

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते दिसले विजयाचे सोहळे.

पाचवी चारोळी

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते झाले शिवराय नि शंभू छावा,

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसता मिळाला स्वराज्य ठेवा.

सहावी चारोळी

मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा

तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा,

सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने,

स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने.

सातवी चारोळी

इतिहासा, तू वळूनी पहा, पाठीमागे जरा,

झुकवूनी मस्तक करशील,जिजाऊंना मानाचा मुजरा.

आठवी चारोळी

मुजरा माझा माता जिजाऊला,

घडविले तिने शूर शिवबाला,

साक्षात् होती ती आई भवानी,

जन्म घेतला तिच्या पोटी शिवबानी.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा