लोकशाही स्पेशल

राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त 'हे' खास स्टेटस ठेवून करा अभिवादन

राजमाता जिजाबाई यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान शासकाला घडवले. राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावरुन अभिवादन करा.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Rajmata Jijau Jayanti 2024 : राजमाता जिजाबाई यांचा जन्म १२ जानेवारी, १५९८ रोजी महाराष्ट्रातील सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. राजमाता जिजाबाई यांनी  शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान शासकाला घडवले. राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावरुन अभिवादन करा.

जिजाऊ…

ज्यांच्या प्रेरणेने उजळली

स्वराज्यज्योती

याच माऊली ज्यांनी घडवले

श्री शिवछत्रपती

राजमाता जिजाबाईं यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

स्वराज्याचा जिने घडविला विधाता….

धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता …

जय भवानी ! जय शिवाजी !

जय जिजाऊ

तुम्ही नसता तर नसते झाले

शिवराय अन शंभू छावा

तुमच्या शिवाय नसता मिळाला

आम्हांला स्वराज्याचा ठेवा

जय जिजाऊ!

मुजरा माझा माता जिजाऊंना,

जिने घडविले शुर शिवबाला.

साक्षात होती ती आई भवानी,

जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी!

राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

जननी मराठा साम्राज्याची,

सारूनी बाजूस राजघराणी.

जनतेच्या साऱ्या न्यायाखातर,

लढा लढविली ही रणरागिणी.

जय भवानी ! जय शिवाजी !

जय जिजाऊ

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?