Admin
लोकशाही स्पेशल

Ram Navami 2023 : राम जन्मला ग सखे! आज देशभरात राम नवमीचा उत्साह

आज चैत्र शुध्द नवमी श्री राम नवमी.

Published by : Siddhi Naringrekar

आज चैत्र शुध्द नवमी श्री राम नवमी. आज देशभरात राम नवमीचा उत्साह आहे. सगळीकडे मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जात आहे. यानिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना नंतर पहिल्यांदाच यावर्षी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात शेगावात साजरा होत आहे. सगळीकडे मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जाते. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं जाते. यंदा गुरुवारी ३० मार्च रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला. भगवान रामाची जयंती म्हणून देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

आज गुरुपुष्यामृत ही असल्याने दिवसभर सगळीकडे मोठ्या जल्लोषात हा साजरा होणार आहे. अयोध्यासोबतच तसेच महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली जात आहे.

राम नवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवमी तारखेला भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या रामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. रामनवमीला रामायण आणि रामरक्षा स्तोत्राचा पाठ वाचला जातो. या दिवशी सर्व मंदिरे विशेष सजवली जातात आणि भजन-कीर्तनाचे आयोजन केले जाते.

रामनवमी मध्यान्ह मुहूर्त सकाळी ११.११ पासून सुरु होईल आणि दुपारी १.४० वाजता समाप्त होईल. नवमी तिथी सुरुवात: २९ मार्च संध्याकाळी ७.३७ पासून, नवमी तिथी समाप्त: ३० मार्च ते रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. दुधाने श्रीरामाचा अभिषेक करून राम चरित मानस पठण करा,

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा