लोकशाही स्पेशल

Chhagan Bhujbal : ठाकरे बंधूंनी एकत्र आल्यानंतर शक्ती वाढणार, छगन भुजबळांची प्रतिक्रिया

पवार काका-पुतण्यांच्या युतीवर आणि ठाकरे बंधु एकत्र येण्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना आपली रोखठोक भूमिका मांंडली

Published by : Prachi Nate

(Chhagan Bhujbal) मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. भुजबळांना जबाबदारी दिल्याचे शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. यादरम्यान आज मंत्री छगन भुजबळ यांनी लोकशाही मराठीसोबत चर्चा केली. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातील हॉट टॉपिकवरही मंत्री छगन भुजबळांनी वक्तव्य केलं आहे. राज्याच्या राजकारणात महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे ही दोन घराणी सर्वात पॉवरफुल्ल असल्याचं ते म्हणाले आहेत.

पण महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही घरात राजकीय फूट पडली असून( Raj Thackeray Uddhav Thackeray together) ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या, आणि(Ajit Pawar Sharad Pawar together) पवार काका-पुतण्यांच्या युतीची चर्चा जोर धरू लागल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर छगन भुजबळ लोकशाही मराठी सोबत बोलताना आपली रोखठोक आणि मिश्कील प्रतिक्रिया देत म्हणाले की, " एक कार्यकर्ता आमचा वाढला की आम्हाला वाटतं की, आमचा पक्ष वाढला. आमच्या पक्षातले लोक जेव्हा गावोगावी जातात, तेव्हा बघतो आम्ही कधी याचा प्रवेश होतो कधी त्याचा प्रवेश होतो यामगचं कारण असं की, पक्षाची शक्ती वाढेल".

"त्यामुळे हे दोन ठाकरे, राज ठाकरेंच तर स्वतःचं कर्तुत्व आहेच ना... आणि उद्धव ठाकरेंनी पण स्वत:च कर्तुत्व सिद्ध केलं आहे. अशावेळी जर हे दोघे एकत्र आले तर निश्चितपणे शक्ती वाढणार. एक साधा कार्यकर्ता आला तरी आम्हाला आनंद होतो. हे तर दोन मोठे नेते आहेत आणि लोकांमध्ये त्यांच प्रेम आहे. जून्या शिवसैनिकाला असं वाटतं की यांनी एकत्र याव". असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी