लोकशाही स्पेशल

Swami Vivekananda Quotes : स्वामी विवेकानंदांचे 'हे' अमूल्य विचार बदलू शकतात तुमचे जीवन

स्वामी विवेकानंदांनी काही खास संदेश दिले होते. त्यांचे शब्द तुमचे जीवन बदलू शकतात आणि तुम्हाला नवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहित करू शकतात.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Swami Vivekananda Quotes : स्वामी विवेकानंदांचे विचार आजही लोकांच्या हृदयात आहेत. स्वामी विवेकानंद हे एक समाजसेवक, समाजसुधारक होते, ज्यांच्या विचारांनी लोकांमध्ये क्रांती घडवून आणली. स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी दरवर्षी ४ जुलै रोजी साजरी केली जाते. स्वामी विवेकानंदांनी काही खास संदेश दिले होते. त्यांचे अनमोल शब्द आजही लोकांमध्ये जिवंत आहेत आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पुढे जाण्याची प्रेरणा देतात. त्यांचे शब्द तुमचे जीवन बदलू शकतात आणि तुम्हाला नवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहित करू शकतात. चला जाणून घेऊया स्वामी विवेकानंदांच्या प्रसिद्ध संदेशांबद्दल.

स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

– स्वामी विवेकानंद

उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबू नका.

– स्वामी विवेकानंद

अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.

– स्वामी विवेकानंद

आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू कराल आणि जर तुम्ही हरलात तरी तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता.

– स्वामी विवेकानंद

चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.

– स्वामी विवेकानंद

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा