आज जागतिक वडापाव दिवस आहे. आजच्या दिवशी लोकांनी पहिल्यांदा वडापाव प्रकार नेमका कसा असतो आणि त्याची चव कशी असते हे चाखले होते. मुंबईत सुरु झालेलं हे स्ट्रीट फूड संपूर्ण जगात प्रसिद्ध झालं. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना वडापावची चव आवडली. वडापावची सुरुवात नेमकी कशी झाली? चला तर मग जाणून घेऊया.
वडपावचा जन्म 1966 चा. दादर स्टेशन बाहेरील अशोक वैद्य यांच्या खाद्यगाडीवर वडापाव पहिल्यांदा बनला, त्याचदरम्यान, दादर मधील सुधाकर म्हात्रे यांनी वडापावची सुरुवात केली. फक्त बटाट्याची भाजी आणि चपाती खाण्याऐवजी भाजीचा गोळा बेसनात घोळवून तळून पावासोबत खाल्यास अधिक स्वादिष्ट लागतो हे लक्षात आल्याने वडापावची सुरुवात झाली आणि वडापावची इतक्या वर्षांची यशस्वी परंपरा मुंबईला लाभली.
गरीबांनाही परवडेल अशा दरात वडापाव मिळत असल्याने तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला असून मुंबईसाठी ते फेमस खाद्य बनलं. मुंबईत वडापावची सुरुवात झाली तेव्हा त्याची किंमत अगदी 10 पैसे इतकी होती. आज वडापाव पाच रुपयांपासून तर मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत मिळतो. आज वडापाव हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. मुंबई हा खाद्यपदार्थ हा परदेशातून आलेल्या पर्यटकांना सुद्धा आवडतो. मुंबईतील दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव येथील मिल मजूरांमुळे खरंतर वडापावला लोकप्रियता मिळाली. 1970 ते 1980 च्या काळात मुंबईमध्ये मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या. त्यानंतर मुंबईच्य गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. यादरम्यान शिवसेनेने मुंबईतील दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन छेडले. याचाच एक भाग म्हणून काही शिवसैनिकांनी दक्षिण भारतीय पदार्थ सोडून वडापाव खाण्यास सुरुवात केली.
आज वडापाव हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. मुंबई हा खाद्यपदार्थ हा परदेशातून आलेल्या पर्यटकांना सुद्धा आवडतो. मुंबईत अनेकजण ऑफिसला जाताना वडापाव खातात. ऑफिसवरून परत घरी जात असतांना भूक लागली असेल, तर वडापाव खाऊन आपली भूक मिटवितात. आज मुंबईत दिवसाला जवळपास 18 ते 20 लाख वडापाव खपतात. मुंबईमध्ये कीर्ती कॉलेजजवळचा अशोक वडापाव, श्रीकृष्ण छबीलदास आणि तर सीएसटीसमोरील आराम वडापाव हा फार प्रसिद्ध वडापाव आहे.