लोकशाही स्पेशल

आज हरतालिका, जाणून घ्या पूजेची वेळ, व्रत आणि विधी

Published by : Lokshahi News

भाद्रपद शुक्ल तृतियेला म्हणजेच आज 9 सप्टेंबर रोजी हरतालिकेच्या पूजेसाठी योग्य मुहूर्त सकाळी 6 वाजून 3 मिनिटांपासून सकाळी 8 वाजून 33 मिनिटांपर्यंत चांगला मुहूर्त आहे तर प्रदोष काल हरितालिका व्रत पूजा मुहूर्त हा सायंकाळी 6 वाजून 33 मिनिटापासून ते रात्री 8 वाजून 51 मिनटांपर्यंत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शिव-पार्वतीच्या मातीच्या मूर्तीचे (पिंडीचं) विसर्जन करून महिला हा व्रत पूर्ण करतील.

महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. यादिवशी महिला दिवसभर काहीच खात नाहीत. त्यामुळे हरतालिकेचा उपवास सर्वात कठिण उपवासांपैकी एक मानला जातो. यंदा 9 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच आज देशभरात हरतालिका साजरी केली जाणार आहे. वैवाहिक महिलांसोबतच कुमारीका सुद्धा हरतालिकेचा उपवास करतात. हे व्रत केल्याने मनासारखा जोडीदार मिळतो, असे सांगितले जाते. त्यामुळे कुमारीका सुद्धा हे व्रत करतात.

भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने केले होते व्रत
हरतालिका तृतीया साजरी करण्यामागे अशी अख्यायिका आहे की, भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने सर्वात आधी हरतालिकेचे व्रत केले होते. हरतालिका दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे. एक हरत आणि दुसरे आलिका. यामध्ये हरत चा अर्थ होतो अपहरण आणि आलिका चा अर्थ होतो सहेली. हे दोन शब्द एकत्र येऊन हरतालिका हा शब्द तयार झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump On Narendra Modi : "ते महान आहेत मात्र...यामुळे ते मला पसंत नाही", टॅरिफवरुन बिघडलेल्या संबंधांनंतर ट्रम्प यांचे मोठं विधान

Chinchpoklicha Chintamani Visarjan : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ; गणेशभक्तांचा जल्लोष

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk : पालखी निघाली राजाची! मंडपातून बाहेर पडला राजा अन्... लालबागच्या राजाचा मुख्यप्रवेशद्वारा बाहेर थाट

Lalbaugcha Raja Visrajan 2025 : पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात