लोकशाही स्पेशल

आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात; पूजनाची सोपी पद्धत, महत्त्व जाणून घ्या

कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह साजरा करतात. ४ नोव्हेंबरला यंदा कार्तिकी एकादशी आहे. त्यानंतर ५ नोव्हेंबरला तुलसी विवाहास प्रारंभ होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह साजरा करतात. ४ नोव्हेंबरला यंदा कार्तिकी एकादशी आहे. त्यानंतर ५ नोव्हेंबरला तुलसी विवाहास प्रारंभ होणार आहे. यंदा ५ ते ८ नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाहाचे मुहूर्त आहेत.5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 06.08 वाजता द्वादशी तिथी सुरू होईल. द्वादशी तिथी 6 नोव्हेंबर (रविवार) संध्याकाळी 05:06 मिनिटांपर्यंत राहील. तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 6 नोव्हेंबरला दुपारी 01:09 ते 03:18 पर्यंत राहील.

धार्मिक मान्यतांनुसार भगवान विष्णू चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर कार्तिकी एकादशीला निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना, लग्न समारंभांना सुरुवात केली जाते. कार्तिकी द्वादशी ते पौर्णिमेच्या दिवसापर्यंत तिन्ही सांजेच्या मुहूर्तावर तुळशीचे लग्न लावले जाते. तुळशीचे लग्न लावणाऱ्याला कन्यादानाचे पुण्य लाभते तसेच घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळतो, अशी धारणा आहे.असे मानले जाते की जे लोक कन्या सुखापासून वंचित राहतात त्यांनी या दिवशी तुळशीजीचा विवाह भगवान शालीग्रामसोबत केल्यास त्यांना कन्यादानाचे फळ प्राप्त होते. या दिवसापासून लोक सर्व शुभ कार्यांना सुरुवात करू शकतात. तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते. या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबरला आहे. कार्तिक पौर्णिमेला हे चंद्रग्रहण आहे. हे या वर्षातील शेवटचे ग्रहण आणि दुसरे खग्रास चंद्रग्रहण राहणार आहे

तुळशी विवाहासाठी पाटावर आसन टाकून तुळस आणि शाळीग्राम मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. पट्टभीवती ऊस किंवा केलुयाच्या पानांचा मंडप सजवून कलश ठेवला जातो. सर्वप्रथम कलश आणि गौरी गणेशाची पूजा करावी. त्यानंतर माता तुळशीला आणि भगवान शालिग्रामला धूप, दिवा, वस्त्र, माळा, फुले अर्पण करा. तुळशीला श्रृंगार आणि लाल ओढणी अर्पण केली जाते. तुलसी मंगलाष्टक पठण झाल्यावर भगवान विष्णू आणि तुळशीची आरती केली जाते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

BMC Election : मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 410 हरकती आणि सूचना

Latest Marathi News Update live : सुनील तटकरे यांची आज पत्रकार परिषद; महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

Ganpati Visarjan 2025 : बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

Latest Marathi News Update live : विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावचं लागेल….