फेब्रुवारी महिना हा कपल्ससाठी खूप खास मानला जातो. या महिन्यामध्ये ७ ते १४ तारखेरपर्यंत 'व्हॅलेटाईन वीक' म्हणून ओळखला जातो. पाश्चिमात्य संस्कृतीचे सण भारतामध्ये आता साजरे केले आहे. प्रेमकरणाऱ्या सर्वांसाठी हा दिवसाचे खूप महत्त्व असते. या आठवड्यातील कोणत्या दिवशी का आहे, त्याबद्दल या लेखकामध्ये तुम्हाला सांगणार आहोत.
७ फेब्रुवारी २०२५ रोज डे
व्हॅलेटाईन वीकच्या पहिल्या दिवशी गुलाब देऊन त्यांच्या मनातील भावना व्यक्त करतात. गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. हा दिवस एकमेकांबद्दलचे प्रेम, आदर आणि स्नेह व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग आहे. जर तुम्हाला कोणाला गुलाब देऊन प्रेम व्यक्त करायचे असेल तर हा उत्तम दिवस आहे.
८ फेब्रुवारी २०२५ प्रपोज डे
व्हॅलेटाईन वीकच्या दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दलच्या मनातल्या भावना ओठांपर्यंत आणण्याचा महत्त्वाचा दिवस. या दिवशी युवक- युवती आपल्या भावना देखील व्यक्त करतात.
९ फेब्रुवारी २०२५ चॉकलेट डे
व्हॅलेटाईन वीकच्या तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. चॉकलेट हे प्रेम आणि मित्रत्व व्यक्त करण्यासाठी विशेष मानला जातो.चॉकलेट हे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आवडते, म्हणून या दिवशी चॉकलेट देऊन नात्याची गोड सुरुवात करतात. येथे कॉलरने जखमी काळ्या अस्वलाच्या पिल्लाला एका झाडाला बांधून ठेवले आणि त्याला गोळी घालण्याची परवानगी दिली. परंतु, रुझवेल्टला त्या पिल्लाची अवस्था बघवली नाही आणि त्याने त्याला सोडून दिले. १६ नोव्हेंबरला एका वृत्तपत्राने या घटनेचे व्यंगचित्र काढले आणि प्रदर्शित केले. तेव्हा एका व्यापाराने ते व्यंगचित्र पाहून लहान मुलांची खेळणी बनवली तेव्हा पासून टेडी बियर प्रचलित झाले.
१० फेब्रुवारी २०२५ टेडी डे
व्हॅलेटाईन वीकचा चौथा दिवस म्हणजे टेडी डे. या दिवसाचे महत्त्व म्हणजे अमेरिकेतील तत्कालीन अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट मिसिसिपीच्या हे शिकारीला गेले होते. त्यावेळी त्यांना एकही शिकार भेटली नव्हती. त्यावेळी त्यांनी असिस्टंट होल्ट कॉलियर होते.
११ फेब्रुवारी २०२५ प्रॉमिस डे
व्हॅलेटाईन वीकचा पाचवा दिवस म्हणजे प्रॉमिस डे. यादिवशी कपल्स आपल्या जोडीदाराला वचन देतात. या वचनांचा अर्थ फक्त शब्दांत नाही, तर त्यात भावना आणि प्रेम असते. त्यामुळे नात्याचा धागा अजून जास्त मजबूत होतो.
१२ फेब्रुवारी २०२५ हग डे
व्हॅलेटाईन वीकचा सहावा दिवस म्हणजे हग डे. यादिवशी कपल्स एकामेकांना मिठी मारुन विश्वासाचे बंधन तयार करतात. मिठी मारल्याने ताणतणाव कमी होतो, नात्यांमध्ये विश्वास टिकून राहतो.
१३ फेब्रुवारी २०२५ किस डे
व्हॅलेटाईन वीकचा सातवा दिवस म्हणजे किस डे. जोडीदाराला आपल्या मनातील भावना जेव्हा बोलण्यातून मांडता येत नाही. तेव्हा जोडीदाराला स्पर्शातून प्रेम जाणीव करून देण्यासाठी किस डे साजरा केला जातो.
१४ फेब्रुवारी 2025 व्हॅलेंटाईन डे
व्हॅलेटाईन वीकचा आठवा दिवस आणि महत्वाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. यादिवशी कपल्स बाहेर फिरायला जातात. एकामेकांना विश्वास देतात की, ते कायम सोबत एकमेकांसोबत राहतील. रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो.