लोकशाही स्पेशल

Viral Video : १० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले पण ट्रॅफिकमध्ये अडकले...

राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. गुजरातमधील पाच पर्यटकांनी हॉटेलमध्ये तब्बल १० हजार ९०० रुपयांचं जेवण केलं आणि पैसे न भरता पळ काढला.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • १० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले

  • जेवणानंतर ‘गायब’ झाले पर्यटक

  • अखेर ऑनलाइन भरलं बिल

राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. गुजरातमधील पाच पर्यटकांनी हॉटेलमध्ये तब्बल १० हजार ९०० रुपयांचं जेवण केलं आणि पैसे न भरता पळ काढला. मात्र, रेस्टॉरंट मालकानं हुशारी दाखवत ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या या पर्यटकांना रस्त्यातच गाठलं आणि बिल वसूल केलं. ही घटना रिको पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जेवणानंतर ‘गायब’ झाले पर्यटक

गुजरातमधील पाच जणांचा पर्यटकांचा ग्रुप, ज्यामध्ये एका महिलेचा समावेश होता, सिरोही जिल्ह्यातील सियावा परिसरातील हॅपी डे हॉटेलमध्ये थांबला होता. या पर्यटकांनी विविध खाद्यपदार्थांची ऑर्डर देत भरपूर जेवण केले. बिल १०,९०० रुपये इतके आले.

बिल चुकवण्याची वेळ आली असता पर्यटकांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना फसवण्यासाठी शक्कल लढवली. त्यांनी शौचालयाचा बहाणा करत एक-एक करून हॉटेलमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच पाचही जण कारमध्ये बसून घटनास्थळावरून पळून गेले.

मालकाचा पाठलाग

थोड्याच वेळात वेटरला ग्राहकांनी पैसे न देता पळ काढल्याचं लक्षात आलं. त्यानंतर हॉटेल मालकानं तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यामध्ये संबंधित पर्यटकांची गाडी गुजरात सीमेकडे म्हणजेच अंबाजी रोडकडे जात असल्याचं दिसून आलं.

हॉटेल मालक आणि काही कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि स्वतःही पर्यटकांचा पाठलाग सुरू केला. त्यांनी वाहन घेऊन गुजरात सीमेकडे धाव घेतली.

वाहतूक कोंडीत अडकले

पर्यटकांची कार अंबाजीजवळ मोठ्या वाहतूक कोंडीत अडकली. हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी संधी साधत त्या वाहनाला गाठलं. त्यांनी पर्यटकांना तिथेच थांबवलं आणि घटनेचं चित्रीकरणही केलं. या व्हिडिओमध्ये गाडीवर गुजराती नंबर प्लेट दिसून येते.

अखेर ऑनलाइन भरलं बिल

दरम्यान, पोलिस घटनास्थळी पोहोचले. पर्यटकांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. त्यांनी चुकीची कबुली देत आपल्या एका मित्रामार्फत ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करून बिलाची रक्कम भरली. त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हॉटेल कर्मचाऱ्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. अनेकांनी पर्यटकांच्या वर्तनावर टीका केली असून, हॉटेल मालकाच्या तत्परतेचं आणि चातुर्याचं कौतुक केलं जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा