Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : भारतात पहिल्यांदा चित्रपटाचे प्रदर्शन

महेंद्रसिंह धोनी यांचा जन्म, कॅप्टन विक्रम बत्रा शहीद

Published by : shweta walge

सुविचार

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

आज काय घडले

१८९६ मध्ये मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.

१९१० मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ पुण्यात स्थापना करण्यात आली. इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे हे या मंडळाचे संस्थापक होते.

१९८५ मध्ये विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

आज यांचा जन्म

शीख धर्मीयांचे आठवे गुरू गुरू हरकिशन यांचा १५५६ मध्ये जन्म झाला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना गुरूपद मिळाले.

भारतीय संगीतकार अनिल बिस्वास यांचा १९१४ मध्ये जन्म झाला. १९३५ ते १९६५ या कालखंडात संगीतकार म्हणून त्यांनी अनेक चित्रपटगीतांसाठी चाली रचल्या.

मराठी नाटकांतील आणि चित्रपटांतील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा १९४८ मध्ये जन्म झाला. स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून त्यांची ख्याती होती.

गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा १९६२ मध्ये जन्म झाला.

भारतीय गायक कैलाश खेर यांचा १९७३ मध्ये जन्म झाला. २००७ सालचा सर्वोत्तम पार्श्वगायकासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू व माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांचा १९८१ मध्ये जन्म झाला. धोनीला 'कॅप्टन कूल' म्हणून संबोधले जाते.

आज यांची पुण्यतिथी

स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचे १९३० मध्ये निधन झाले.

परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित कॅप्टन विक्रम बत्रा १९९९ मध्ये शहीद झाले. कारगिल युद्धात पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५ या ठिकाणी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.

मराठी चित्रपट व नाट्य अभिनेत्री रसिका जोशी यांचे २०११ मध्ये निधन झाले. त्यांच्या अनेक विनोदी भूमिका गाजल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा