लोकशाही स्पेशल

World Milk Day 2024: जागतिक दूध दिवस या दिवसाचं महत्त्वं काय? जाणून घ्या...

1 जून रोजी संपूर्ण जगभरात दूध दिवस साजरा केला जातो.

Published by : Dhanshree Shintre

1 जून रोजी संपूर्ण जगभरात दूध दिवस साजरा केला जातो. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो. लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणं हा या दिवसाचा उद्देश आहे. सर्वात पहिला दूध दिवस 1 जून 2001 रोजी साजरा करण्यात आला होता.

जगात जागतिक दूध दिनाचे महत्त्व

जगात दूध आणि डेअरी क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन जागतिक दूध दिन साजरा केला जातो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या फायद्यांचा जगभरात प्रचार केला जातो. सध्या जगभरातील सुमारे एक अब्ज लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन दूध आहे. 2001 पासून दरवर्षी 1 जून हा दिवस जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) याची स्थापना केली.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित काही इतर तथ्ये

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून जागतिक उत्पादनात 22 टक्के वाटा आहे. त्यानंतर अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो.

1970 पासून दूध उत्पादनाचा सर्वाधिक विस्तार दक्षिण आशियातील देशांमध्ये झाला. जे विकसनशील देशांमध्ये दोष उत्पादन वाढीचे मुख्य स्त्रोत आहे.

आफ्रिकेतील दूध उत्पादन विकसनशील देशांच्या तुलनेत खूपच कमी वेगाने वाढत आहे, मुख्यतः गरिबी आणि हवामान बदलामुळे.

चीन, इटली, रशिया, मेक्सिको, अल्जेरिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये सर्वाधिक दुधाचा तुटवडा आहे.

गायीचे दूध हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे दूध आहे. आरोग्यासाठी असे मानले जाते की गाईचे दूध इतर प्रकारच्या दुधापेक्षा चांगले असते.

जगभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी दुग्धजन्य पदार्थ हे उत्पन्नाचे मौल्यवान स्त्रोत आहेत.

जगातील अनेक देशांच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा दूध हा महत्त्वाचा भाग आहे.

भारतातील जागतिक दूध दिवस

फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन कॉर्पोरेट स्टॅटिस्टिकल डेटाबेस (FAOSTAT) च्या उत्पादन आकडेवारीनुसार, भारत दुग्ध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील दूध उत्पादनात आणखी वाढ करण्यासाठी, भारत सरकार अनेक केंद्र पुरस्कृत योजना राबवत आहे. तसेच 2014 मध्ये राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेचे उद्दिष्ट देशी जातींचा विकास आणि संवर्धन, गोवंश लोकसंख्येचे अनुवांशिक सुधारणा आणि दुग्धोत्पादन आणि गायींची उत्पादकता वाढवणे हे आहे. आज जगभरात मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होत आहे. भारताने दूध उत्पादनातून जागतिक स्तरावर वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. दरम्यान मिल्क मॅन अशी ओळख असलेले वर्गिस कुरियन हे भारतातील धवल क्रांतीचे जनक आहेत. कुरियन यांनी 'अमूल'च्या माध्यमातून देशात दुग्ध क्रांती घडवली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबईला दिवसभर मुसळधार पावसाने झोडपलं

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा कहर; 11 जणांचा बळी, जनजीवन विस्कळीत, पिकांचे प्रचंड नुकसान

Devendra Fadnavis : चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो रेल पडली बंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले...

Mono Rail : चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडली; प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू