लोकशाही स्पेशल

Rakshabandhan 2024: रक्षाबंधनाला बांधलेली राखी कधी काढावी आणि कुठे ठेवावी? जाणून घ्या...

भावा-बहिणींच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाच्या मनगटाला राखी बांधतात तर भाऊदेखील आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.

Published by : Dhanshree Shintre

भावा-बहिणींच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाच्या मनगटाला राखी बांधतात तर भाऊदेखील आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण राखी बांधल्यानंतर ती किती दिवसांत काढावी, यासाठी काही नियम आहेत.

राखी बांधल्यानंतर ती मनगटावरुन कधी काढावी याचेही काही वास्तू नियम आहेत. हे नियम लक्षात घेणे गरजेचे आहे. नाहीतर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. शास्त्रात राखी काढण्यासाठी कोणताही निश्चित दिवस किंवा निश्चित अशी वेळ सांगितलेली नाही. रक्षाबंधनाच्या 24 तासांनंतर तुम्ही हातावरून राखी काढू शकता. अनेक ठिकाणी लोक रक्षाबंधनापासून जन्माष्टमीपर्यंत राखी बांधतात. त्यानंतर ते उघडून बाजूला ठेवतात. अनेक दिवस राखी बांधून ठेवल्यास ती अपवित्र होते, ज्यामुळे दोष निर्माण होतात.

राखी पौर्णिमेनंतर काही दिवसांनी पितृपक्ष सुरू होत आहे, त्यामुळे अशा स्थितीत आपण मनगटावर राखी ठेवू नये, असे तज्ज्ञमंडळींचे म्हणणे आहे. म्हणून रक्षाबंधनाच्या 24 तासांच्या आत हातावरील राखी काढावी. अन्यथा नकारात्मकता निर्माण होऊ शकतात. मनगटावरील राखी काढल्यानंतर ती इकडे-तिकडे कुठेही न ठेवता, तिचे व्यवस्थित विसर्जन करावे. विसर्जन म्हणजे आपण ही राखी एखाद्या झाडावरही बांधू शकता. राखीचा दोरा तुटला असेल तर ती राखी जपून ठेवू नये. अशी राखी एखाद्या झाडाखाली ठेवावी किंवा तिचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. असे करताना त्यासोबत एक रूपयाचे नाणे देखील ठेवावे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उद्धव ठाकरेंनी घेतली विदर्भ, मराठवाडा जिल्हाप्रमुखांची बैठक…

Mumbai Police : महाराष्ट्र पोलीस भरतीत मोठी संधी!, वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही पोलीस भरतीत अर्जाची परवानगी

Bigg Boss Season 19 : नेहल चुडासमाचे अमाल मलिकवर गंभीर आरोप; बिग बॉस 19 मध्ये वादाची लाट

ITR FILING : आता दिवस उरले 3, आयटीआर भरायला उशिरा झाला भरल्यास काय होते जाणून घ्या...