लोकशाही स्पेशल

National Youth Day 2024 : राष्ट्रीय युवा दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या

१२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.

Published by : Team Lokshahi

१२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. यादिवशी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवापिढींसाठी अनेक शाळांमध्ये, कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जेणेकरून युवापिढींमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी.

१९८४ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने १२ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून घोषित केले होते. तेव्हापासून देशभरात दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा होऊ लागला. यादिवशी संपूर्ण भारतात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मिरवणूक, भाषण, संगीत, युवा संमेलन, चर्चासत्रे, सादरीकरण, निबंध-लेखन, पठण इत्यादी स्पर्धांसह साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे मुख्य उद्देश स्वामी विवेकानंद यांचे विचार, आदर्श प्रत्येक युवापिढींपर्यंत पोहोचवणे आहे.

ही आहे २०२४ ची थीम

यावर्षी राष्ट्रीय युवा दिनाची थीम 'इट ऑल इन द माइंड' आहे. याचा मराठीमध्ये 'सर्वकाही जे तुमच्या मनात आहे' असे आहे. यादिवशी अनेक सार्वजनिक ठिकाणी जसं की शाळा, कॉलेज, इत्यादी ठिकाणी स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ 'राष्ट्रीय युवा दिन' साजरा केला जातो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा