World Food Day  Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

World Food Day : आज जागतिक अन्न दिन, जाणून घ्या अन्नाशी संबंधित या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

जागतिक अन्न दिन दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना प्रथम 1945 मध्ये झाली.

Published by : shweta walge

जागतिक अन्न दिन दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना प्रथम 1945 मध्ये झाली. उपासमारीवर कारवाई करणे हा या संघटनेचा उद्देश होता. त्यानंतर १९७९ मध्ये पहिल्यांदा जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जाऊ लागला. हा दिवस साजरा करण्याचे विशेष महत्त्व आहे. अन्न दिनानिमित्त अन्न सुरक्षा आणि पौष्टिक आहाराची गरज याबाबत लोकांना जागरुक केले जाते. कोणत्याही शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याची तसेच चवीची काळजी घेण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.

अन्न दिवसाचा इतिहास

अन्न आणि कृषी संघटना (FAO) ची स्थापना 1945 मध्ये झाली. ही संस्था अन्न सुरक्षा आणि पोषक तत्वांवर काम करते. संस्था लोकांना अन्न आणि पौष्टिक आहाराबाबत जागरूक करते. संस्थेच्या प्रयत्नांमुळे १९७९ मध्ये जागतिक अन्न दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 16 ऑक्टोबर 1981 पासून जागतिक अन्न दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

जागतिक अन्न दिन 2022 ची थीम

दरवर्षी ही संस्था जागतिक अन्न कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीद्वारे अन्नसुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करण्याचे काम करते. संस्था या दिवसासाठी विशिष्ट थीम ठरवते. या वर्षी जागतिक अन्न दिन 2022 ची थीम 'कुणालाही मागे सोडू नका' आहे.

अन्न दिनाचे महत्त्व

जगातील अनेक देश सध्या दारिद्र्यरेषेखाली आहेत. या देशांतील लोकांना संतुलित आहार मिळत नाही. त्यामुळे बहुसंख्य जनता कुपोषित होत आहे. संतुलित आणि पौष्टिक आहाराच्या अभावामुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात. कुपोषणाची समस्या दूर करणे आणि लोकांना संतुलित आणि पौष्टिक आहाराची जाणीव करून देणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा