लोकशाही स्पेशल

जागतिक हृदय दिन; अशी घ्या हृदयाची काळजी

२९ सप्टेंबर हा दरवर्षी जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. भारतासह जगभरात हृदयरोगांमुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. आजच्या काळात हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अनेक लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. हल्ली प्रत्येकाची जीवनशैली पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या आजाराला सामोरे जावे लागते.

Published by : Siddhi Naringrekar

२९ सप्टेंबर हा दरवर्षी जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. भारतासह जगभरात हृदयरोगांमुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. आजच्या काळात हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अनेक लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. हल्ली प्रत्येकाची जीवनशैली पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या आजाराला सामोरे जावे लागते.

हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे लोकांना हृदयविकारांबाबत जागरूक करणे आहे. हृदय रोग टाळण्यासाठी गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे बंद करायला हवे. दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. वयाची ३० वर्षे पूर्ण होताच हृदयाची तपासणी करून घ्या. त्यात उच्च् रक्तदाब, कोलेस्टेरॉल व मधुमेहाची तपासणी होते. त्यानंतर वर्षातून एकदा तपासणी अवश्य करा.

जागतिक आरोग्य संघटनेनं २०१३ मध्ये नॉन कम्युनेकेबल डिसीज नियंत्रणात आणण्यासाठी मोहीम सुरू केली होती. (CVD) कार्डीओ वॅस्क्युलर डिसीज त्यातील महत्वाचा भाग होता. २०२५ पर्यंत (CVD) मुळे वाढणारा मृत्यूदर २५ टक्क्यांनी कमी करणं हे त्या मागचं उद्दिष्ट होतं. हृदयाच्या आजारांमुळे वाढणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

भरपूर व्यायाम करावा. भराभरा चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवावी यासारखा व्यायाम जितक्या वेळा सहन होईल तोपर्यंत करावा. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार व्यायम करावा. तसेच योगात ध्यान, समाधी (मेडिटेशन) आणि यम, नियम, योगासने, प्राणायाम यांचा समावेश होतो. जीवनातील ताणतणाव, तणाव कमी होऊन रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?