आज 'जागतिक जेष्ठ नागरिक दिन' आहे. दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस “ज्येष्ठ नागरिक दिन” म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. वृद्धांवर परिणाम होणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
1988 मध्ये, अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी हीच समस्या लक्षात घेतली आणि ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या जीवनमानावर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. हा दिवस संपूर्ण पणे ज्येष्ठांना समर्पित करण्यात आला आहे. वृद्धाश्रमात त्यांच्यासाठी बऱ्याच प्रकाराचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांचा आनंदाची आणि आदराची काळजी घेतली जाते.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मूळ 19 ऑगस्ट 1988 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ‘Ronald Reagan’ यांनी जाहीर केले होते. 5847 नावाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष यांनी केले. ज्यामध्ये Ronald Reagan यांनी दरवर्षी ऑगस्टचा तिसरा रविवार राष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन म्हणून घोषित करण्याची परवानगी दिली.हा दिवस मानवी समाजातील वृद्ध लोकांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांचा सन्मानासाठी साजरा करण्यात येतो.