महाकुंभ हा हिंदू धर्माच्या पवित्र तीर्थयात्रेतील सर्वात महत्त्वाचा मेळा. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील पवित्र स्थानावर १३ जानेवारीपासून या सोहळ्याची शाही थाटात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवापैकी हा एक उत्सव असल्याच म्हटलं जात. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
अशातच प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातून एक मोठी बातमी समोर आली होती. प्रयागराजमधील मकुंभमेळ्यात रविवारी भीषण आग लागली होती. ही आग शास्त्री पूल सेक्टर १९ मध्ये लागली होती. तर सिंलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तावली जात होती. या अग्निकांडात 20 ते 25 तंबू आणि अनेक लोकांच बरच सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली होती. ही आग मोठ्या प्रमाणात पसरु लागल्याने त्वरित अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरु झालं होत.
दरम्यान सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बाबतीत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. कुंभमेळ्यातील ही आग सिलेंडर स्फोटामुळे लागलेली नसून ती आग एका दहशतवादी संघटनेकडून लावण्यात आल्याचं समोर आलं आहे. कुंभमेळ्यातील स्फोटाची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ई-मेल पाठवला आहे. हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे त्यांनी म्हटलं असल्याची माहिती समोर आहे. हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच आहे. ही सुरुवात आहे, असंही दहशतवाद्यांनी इमेलमध्ये म्हटलं आहे.