महाकुंभ

Kumbhmela : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; नेमकं काय घडलं?

प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. अमृत स्नानाच्या मौनी अमावस्येच्या आधी ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या असून जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच या घटनेमध्ये 10हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येच्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीमुळे संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली. रात्री 2 वाजता गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आलेले बॅरेकेडींग तुटले आणि चेंगराचेंगरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले. तसेच 10 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?