प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या ४५ दिवसांच्या महाकुंभमेळ्याचा आजचा 10 वा दिवस आहे. १४४ वर्षांतून एकदाच हा दुर्मिळ खगोलीय सोहळा येतो. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा पवित्र संगम असलेल्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी संगमच्या घाटांवर हजारो भाविकांची गर्दी जमली आहे. आतापर्यंत सुमारे ८.८१ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आहे.