प्रयागराजमधील संगमच्या पवित्र भूमीवर आयोजित जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, महाकुंभ, सोमवार, १३ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्नान उत्सवाने सुरू झाला. या महाकुंभसाठी साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत अनेक लोक पाहायला मिळाले. ज्यात सर्वात आधी उत्तराखंडची मॉडेल हर्षा रिछारिया फेमस झाली त्यानंतर काही दिवसातच मुंबईमधून असेच एक आयआयटी शिक्षण घेतलेले साधू कुंभमेळ्यात दिसले, आयआयटी बॉम्बे असलेल्या बाबांच नाव अभय सिंह असं आहे.
हे दोघे ही चर्चेत असतानाच एक माळा विकणारी मुलगी तिच्या सौंदर्यामुळे खास म्हणजे तिच्या डोळ्यांमुळे महाकुंभात चर्चेचा विषय ठरली, तिच्या सौंदर्याने संपुर्ण महाकुंभ मेळ्यातील लोकांना भुरळ पाडली. असं असताना आता आणखी एक बाबा त्यांच्या कारमुळे सध्या महाकुंभात चर्चेत येताना दिसत आहेत.
इंदूरहून महाकुंभासाठी आलेल्या महंत राजगिरी यांनी महाकुंभात आपली झोपडी उभारली असली तरी त्यांच्यासोबत उभी असलेली जुनी भगवी रंगाची ॲम्बेसेडर कार सर्वाधिक चर्चेत राहिली आहे. या बाबांना टारझन बाबा किंवा ॲम्बेसेडर कार असेही म्हणतात. बाबांनी असं म्हटलं आहे की, या जीवनशैलीने त्याला सांसारिक संकटांपासून दूर ठेवले आणि स्वावलंबी आणि आत्मकेंद्रित केले. 35-40 वर्षांपूर्वी महंत राजगिरी यांना ही कार दान करण्यात आली होती. तेव्हापासून बाबा जिथे जातात तिथे या गाडीतच जातात. या गाडीमध्ये त्यांना आत्मिक शांती आणि समाधान मिळते.