भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, अर्थात महाकुंभ मेळा हा प्रयागराजमध्ये सुरु आहे. महाकुंभमेळा हा दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. तीन पवित्र नद्यांच्या संगमासह भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांचा अद्भुत संयोग जुळून येतो. पौष पौर्णिमेच्या दिवशी 13 जानेवारीला प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरु झाला आहे, तर 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला शाही स्नानाने महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे.
शाही स्नानाच्या दिवशी प्रयागराजमध्ये भाविक मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते. हिंदू धर्म-संस्कृतीत कुंभमेळ्यादरम्यान शाही स्नान करणं हे पवित्र मानलं जातं आणि त्यातही सहा स्नानांपैकी आजची मौनी अमावस्येची तिथी ही सर्वांत शुभ मानली मानली जाते. कुंभमेळ्यातील स्नानामुळं सर्व दुःख दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे.
रोहित पवार महाकुंभमेळ्यात सहभागी
सध्या सुरु असलेल्या प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर मौनी अमावस्येला होणाऱ्या अमृत स्नानास विशेष महत्त्व असून महाकुंभाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकार प्रयागराजमधील कुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत. याच शुभ मुहूर्तावर आज प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील आमदार रोहित पवार आपल्या पत्नीसह महाकुंभमेळ्यात लावणार उपस्थिती आहेत. तसेच महाकुंभमेळ्यात अमृत स्नान करण्याचं आणि अर्घ्य देण्याचं भाग्य मिळालं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
रोहित पवार यांची राजकीय कारकिर्द
रोहित पवार यांनी 2017 मध्ये बारामती मतदारसंघातून पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर ते 2019 मध्ये कर्जत -जामखेड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. हा विजय त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा महत्त्वाचा टप्पा ठरला. तसेच रोहित पवार यांनी 2022 पासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम सांभाळले आहे.