अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली आहे. याविषयी तिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला आहे. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं जात आहे. ज्यामध्ये ममता कुलकर्णी यांना चादर पोशी विधी करून महामंडलेश्वर ही पदवी दिली गेली. ममता कुलकर्णीला आजपासून नवीन नाव दिलं जाईल. ममता कुलकर्णी आता श्री यामाई ममता नंद गिरि नावाने ओळखली जाईल. किन्नर आखाडाचे आचार्य नारायण त्रिपाठी यानी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र धारण केले आहेत.
ममता कुलकर्णीची पोस्ट
'नमस्कार माझ्या मित्रांनो, मी उद्या 29 तारखेला मौनी अमावस्येला शाहीस्नान करणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी अजोध्येला जाऊन माझ्या पालकांना भेटेन.' असं कॅप्शन देत ममता कुलकर्णी हिने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतल्याची माहिती दिली आहे. ममता कुलकर्णीने अंगावर भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत. त्यासोबतच गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि खांद्यावर एक झोली लटकवत साध्वीच्या रुपात पाहायला मिळत आहे.
कोण आहे ममता कुलकर्णी
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौदर्याने प्रेक्षकांना घायाळ केलं होतं, ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. मात्र काही दिवसांपूर्वी ती पुन्हा चर्चेत आली आणि तेव्हापासून तिच्या विषयी सतत काही नाही माहिती समोर येत आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ममता कुलकर्णी आहे. ममता कुलकर्णी तब्बल २५ वर्षांनी भारतात परतली आहे. ममता कुलकर्णीने नाना पाटेकर, सलमान खान, अक्षय कुमार आणि सनी देओल यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचसोबत तिरंगा, क्रांतिवीर, करण अर्जुन, सबसे बड़ा खिलाड़ी, वक्त हमारा है हे तिचे काही ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत.