१३ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाला. पण, २९ जानेवारीला पहाटे १.३० वाजता गालबोट लावणारी घटना घडली. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी भाविक संगमाकडे जात असताना चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे तर ९० जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या घटनेवर संजय राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले की, भाजपाचे नेते कुंभमेळात सहभागी झाले की, तो परिसर बंद करण्यात येतो. त्यामुळे एक श्रद्धाळू भाविक प्रयागराजमध्ये पोचू शकला नाही, त्यामुळे तिथे गर्दी वाढली, त्यातून पहाटेचा प्रसंग घडला आहे. त्याठिकाणी कोणतीही वैदकीय व्यवस्था नव्हती, एम्बुलेंस देखील नव्हत्या... तिकडचे काही महामंडळ मंडलेश्वर सांगत होते की, कुंभमेळ्याचे नियोजन सैन दलांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं. पण तिथे राजकिय व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मृतांची संख्या वाढली आहे.
अनेकदा गर्दीमुळे अशी चेगंराचेगंरी होते... पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने या संपुर्ण सोहळ्याचं राजकिय प्रचारांसाठी मार्केटिंग केल, त्या अनुशंगाने हा प्रकार गुन्हास्पद आहे. दुर्दैवानं अनेक लोक मृत्यूमुखी पावले, मृत्याची संख्या १० वरून ३०-३५ किंवा त्यापेक्षा जास्त असावी हे प्रत्यक्षदर्शी सांगतात आहेत, जखमींची संख्या अद्याप समोर आली नाही. असंख्य लोक, महिला बेपत्ता आहेत. त्याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेशातील योगी सरकार आहे का? असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.