महाकुंभ

Mahakumbh 2025 : महाशिवरात्रीला होणार महाकुंभमेळ्याची सांगता, कुंभमेळ्यात तब्बल 60 कोटी भाविकांनी केले स्नान

महाकुंभ 2025: महाशिवरात्रीला होणार महाकुंभ मेळ्याची सांगता, आतापर्यंत 60 कोटी भाविकांनी केले स्नान. महाकुंभासाठी साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल.

Published by : Prachi Nate

देशातील प्रयागराज येथे सध्या महाकुंभ मेळ्याची उत्सुकता बघायला मिळत आहे. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्याची सुरुवात झाली. 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी या महाकुंभ मेळ्याची सांगता होणार आहे. या महाकुंभ मेळ्यासाठी आजवर जगभरातील अनेक भाविकांनी हजेरी लावली आहे. या महाकुंभसाठी साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत.

यादरम्यान या महाकुंभ मेळ्यात अनेक साधू संत पाहाया मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभामध्ये आतापर्यंत 60 कोटी भाविकांनी स्नान केल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी केला. कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केल्यास मोक्ष मिळतो अशी अनेक भाविकांची समजूत आहे.

महाकुंभामध्ये स्नान करणाऱ्यांची आतापर्यंतची आकडेवारी-

  • मौनी अमावस्येच्या दिवशी सर्वाधिक 8 कोटी भाविकांचे स्नान

  • मकरसंक्रातीला 3.50 कोटी

  • पौष पौर्णिमेला 1.7 कोटी

  • वसंतपंचमीला 2.57 कोटी

  • माघ पौर्णिमेला 2 कोटी

  • 18 फेब्रुवारीपर्यंत 55 कोटी

  • 22 फेब्रुवारीपर्यंत 60 कोटी

  • महाशिवरात्रीपर्यंत 65 कोटी भाविक स्नान करण्याची अपेक्षा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी