इतर

बनवा टेस्टी कुरकुरीत कारले; वाचा रेसिपी

Published by : Siddhi Naringrekar

कारले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांना कारले खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय वजन कमी करताना खाण्यास सांगितले जाते. पण मुले अनेकदा ते पाहून नाक व तोंड मुरडतात. कारल्याचा कडूपणा मुलांना आवडत नाही. पण ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्यास ते चवदार लागतात. येथे आम्ही तुम्हाला क्रिस्पी तिखट बनवण्याची सोपी पद्धत सांगत आहोत.

साहित्य

- कारले

- चवीनुसार मीठ

- 1/2 टीस्पून हळद

- 2 ते 3 चमचे लाल तिखट

- 1 टीस्पून धने पावडर

- 1/2 टीस्पून जिरे पावडर

- १/२ टीस्पून गरम मसाला

- 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर

- 2 चमचे बेसन

- तेल

कुरकुरीत कारले बनवण्यासाठी कारल्याचे पातळ काप करा आणि मिठाच्या पाण्यात १५-२० मिनिटे भिजवा. नंतर पाणी काढून टाका आणि सर्व मसाले चिरलेल्या कारल्याच्या तुकड्यात टाका. त्यांना चांगले कोट करा.

त्यात कॉर्नफ्लोअर आणि बेसन घालून चांगलं कोट करा. आता कढईत तेल गरम करून त्यावर कारले भाजून घ्या. ते अर्धे शिजल्यानंतर ते परतवा. कुरकुरीत कारले तयार आहेत.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...