NEFT आणि RTGS बाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांची चुकीच्या खात्यात पैसे पाठवण्यापासून सुटका होणार आहे. कारण इथून पुढे RTGS आणि NEFT द्वारे पैसे पाठवताना ग्राहकांना, पैसे पाठवणाऱ्या लाभार्थ्याचे नाव पाहता येणार आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेत सर्व बँकांना निर्देश दिले आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या या नव्या सुविधेमुळे आता ग्राहकांना पैसे पाठवण्यापूर्वीच ज्या व्यक्तीला पैसे पाठवतो त्याचे नाव दिसणार आहे. त्यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. चुकीच्या खात्यात होणारे व्यव्हार कमी व्हावेत, हे यामागचे उद्दिष्ट आहे. तसच आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनाही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत आरबीआयने ३० डिसेंबर रोजी माहिती दिली आहे. दरम्यान आरबीआयने बँकांना १ एप्रिल २०२५ पर्यंत ही प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला ही नवीन सुविधा विकसित करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यानंतर बँका ते त्यांच्या इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देतील. दरम्यान बँकेत जाऊन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनाही ही सुविधा वापरता येणार आहे.