Nokia vs Oppo:
Nokia vs Oppo: Team Lokshahi
इतर

Nokia vs Oppo: चिनी कंपनी Oppo आणि Oneplus ला मोठा झटका, या देशात बंदी

Published by : Siddhi Naringrekar

चिनी स्मार्टफोन (Smartphone) कंपनी OPPO आणि OnePlus यांना नोकियामुळे मोठा झटका बसला आहे. Nokiamob.net ने दिलेल्या वृत्तानुसार, पेटंट वादावर मॅनहाइम प्रादेशिक न्यायालयाने नोकियाच्या बाजूने निर्णय दिला आहे. नोकियाने OPPO आणि OnePlus वर पेटंट उल्लंघनाचा आरोप केला होता. या प्रकरणी कंपन्यांमध्ये करार होईल, असे मानले जात होते, मात्र यावर तोडगा न निघाल्याने नोकियाने गेल्या वर्षी चार देशांमध्ये ओप्पोविरुद्ध खटला दाखल केला.

न्यायालयाच्या निर्णयानंतर, आता Oppo आणि One Plus जर्मनीमध्ये त्यांचे फोन विकू शकणार नाहीत. मात्र ही कायमची बंदी नसणार आहे.

नोकियाने (Nokia) हे प्रकरण वायफाय कनेक्‍शनला स्कॅनिंगपासून संरक्षित करणार्‍या तंत्रज्ञानाने बनवले आहे. 2021 मध्ये, नोकियाने आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये Oppo विरुद्ध पेटंट उल्लंघनाचा खटला दाखल केला. त्यात जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आणि भारत अशा अनेक देशांचा समावेश आहे. ओप्पोने (Oppo) वैध परवान्याशिवाय पेटंट तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा आरोप नोकियाने या प्रकरणात केला आहे.

नोकियाच्या एका निवेदनात असे म्हटले आहे की ओप्पोने (Oppo) दिलेला प्रस्ताव नाकारला होता, त्यामुळे कंपनीकडे कोर्टात जाण्याचा एकमेव मार्ग उरला होता.

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य