एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पार्ले-जी कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. पार्ले-जी कंपनी आता आयटी कंपनीच्या रडारवर आली आहे. कर चोरी प्रकरणी हे छापे पडले असल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या काही ऑफिसमध्ये ही छापेमारी अद्याप सुरु आहे.
90 च्या दशकापासूनची सर्वात प्रसिद्ध बिस्किट उत्पादक कंपनी पार्ले सध्या अडचणीत आहे. मुंबईतील पार्ले ग्रुपवर आयकर विभागाने छापा टाकल्याच्या बातम्या येत आहेत. पार्ले ग्रुप ही पार्ले जी, मोनाको आणि इतर ब्रँड नावांनी बिस्किटे विकणारी फर्म आहे.
मुंबईतील कंपनीच्या अनेक ठिकाणी आयकर विभागाचे छापे टाकण्यात येत आहेत. सकाळपासून हे छापे सुरू आहेत. आयकर विभागाच्या परकीय मालमत्ता युनिट आणि मुंबईच्या आयकर तपास शाखेकडून ही शोध मोहीम राबविली जात आहे. तथापि, ही चौकशी का केली जात आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. छापेमागील कारण छापेमागील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कळू शकेल. सध्या आयकर विभाग कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात व्यस्त आहे.