चटकदार

Ashadhi Ekadashi 2024: तांदळाची किंवा शेवयांची खीर नको तर, या एकादशीचा उपवास सोडा रताळ्याच्या खीरसह

आशाढी एकादशीनिमित्त अनेक भक्त भावभक्तीने एकादशीचा उपवास करतात. हा उपवास द्वादशीला म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो. द्वादशी तिथीला पारण वेळ असे देखील म्हणतात.

Published by : Team Lokshahi

आशाढी एकादशीनिमित्त अनेक भक्त भावभक्तीने एकादशीचा उपवास करतात. हा उपवास द्वादशीला म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो. द्वादशी तिथीला पारण वेळ असे देखील म्हणतात. आशाढी एकादशीचा उपवास पावसाण्यात येतो, त्यामुळे उपवासाला काहीही खाताना काळजी घ्यावी.

पूर्ण दिवस काही न खाता दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यामुळे अनेकांना पित्ताचा त्रास होतो. यामुळे उपवासाला गोड पदार्थ खाऊन उपवास सोडावा. गोड पदार्थांमध्ये कर्बोदक आणि प्रथिने असतात. यामुळे शरीरात ऊर्जा निमार्ण होते. या एकादशीचा उपवास सोडण्यासाठी तांदळाची आणि शेवयांची खीर नाही तर रताळ्याच्या गोड खीरीचा घ्या आनंद.

रताळ्याची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

रताळे

तूप

गूळ

दूध

जायफळ पूड

वेलची पूड

ड्राय फ्रूट्स

रताळ्याची खीर बनवण्याची कृती:

सर्वात आधी रताळे स्वच्छ धुवून घ्या आणि उकडवून घ्या. यानंतर रताळ्यांची साल वेगळी करून रताळे मॅश करा. नंतर एका नॉन-स्टीक पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यात मॅश केलेले रताळे टाका त्याचसोबत गोडासाठी गूळ आणि दूध घालून मिश्रण एकत्र करून घ्या. पॅनमधल्या मिश्रणात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालून 5 ते 10 मिनिटे संपूर्ण मिश्रण शिजवून घ्या. यानंतर तयार झालेली खीर एका लहान बाऊलमध्ये सर्व्ह करून घ्या. अशा प्रकारे एकादशीचा उपवास सोडण्यासाठी स्वादिष्ट आणि गोड रताळ्याची खीर खाऊ शकता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं