चटकदार

'या' पद्धतीने बनवा भोगीची स्पेशल भाजी; वाचा रेसिपी

Published by : Siddhi Naringrekar

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. ही भारतात सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. स्त्रिया ह्या दिवशी दिवाळीसारखेच अभ्यंगस्नान करुन साजशृंगार करतात. विविध भाज्या एकत्रित करुन एक भाजी केली जाते. भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे. हा पहिला सण जानेवारीत मध्यान्हात येतो. 'न खाई भोगी तो सदा रोगी' असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.

भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे! जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरा सभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात.

भोगीची भाजी बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- घेवडा

- हरभऱ्याचे दाणे (ओला हरभरा)

- काटेरी छोटी वांगे

- बटाटे

- रताळे

- गाजर

- फरसबीच्या शेंगा

- खोबरं (किसलेले)

- तीळ (भाजलेले)

- चिंचेचा कोळ

- गुळ

- लाल तिखट

- गोडा मसाला

- तेल

- जीरे

- हिंग

- कडीपत्ता

- चवीनुसार मीठ

सर्व प्रथम भाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या धुवून स्वच्छ करुन घ्या. आता घेवडा सोलून मोठे तुकडे करा. कांटेरी वांग्याला मध्ये चीर देऊन चार भाग करा. बटाटा, गाजर, रताळे सोलून मोठे तुकड्यात कापून घ्या. आता खोबरं आणि तीळ बारीक वाटून घ्या. आता एक कढईत तेल गरम करून त्यात फोडणीचे दिलेले साहित्य घाला. जीरे तडतडले की घेवडा आणि हरभरे घाला. थोडेसे मीठ घालून २ मिनटे परतवा. घेवड्यावर थोडेसे डाग दिसायला लागले की त्यात राहिलेल्या सगळ्या भाज्या घाला. तेलात सगळ्या भाज्या नीट परतून घ्या. आता थोडंस मीठ आणि पाणी घालून झाकण ठेऊन भाज्या शिजू द्या. साधारण १० ते १२ मिनटात भाज्या शिजल्यावर लाल तिखट, गोडा मसाला आणि वाटलेलं वाटण घाला. थोडं गरम पाणी आणि मीठ घालून सगळं नीट मिक्स करा. एक उकळी आल्यावर त्यात गुळ आणि चिंचेचा कोळ घाला. आता त्यात थोडे पाणी घालून अजून एकदा उकळी येऊन तेलाचा तवंग वर दिसू लागला की गॅस बंद करायचा. तुमची भोगीची भाजी तयार आहे.

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस