चटकदार

ढाबा स्टाइल 'दाल फ्राय' तुम्हाला सुद्धा चाखायची आहे, अगदी सोप्या पद्धतीने घरच्याघरी बनवा रुचकर 'दाल फ्राय'

लहान मुलांसोबतचं मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला जेवणात पोषक आणि स्वादिष्ट आहार लागतो. ढाब्यावर बनवली जाणारी दाल फ्राय ही फार चविष्ट आणि सुरस चवीची असते. त्यामुळे ती दाल बहुतेकांच्या पसंतीस पडते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीने दाल फ्राय कशी बनवायची.

Published by : Team Lokshahi

दाल फ्राययाठी लागणारे साहित्य:

एक कप तूर डाळ

अर्धा कप मसूर डाळ

तूप

कांदा

टोमॅटो

आले-लसूण पेस्ट

जिरे

धने पावडर

मसाले

दाल फ्राय बनवण्याची कृती:

एक कप तूर डाळ आणि अर्धा कप मसूर डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चिमूटभर हळद आणि मीठ घालून कुकरला 3 ते 4 शिट्या देऊन डाळ शिजवा. कढईत 2 ते 3 चमचे तूप घेऊन त्यात जिरे, चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यानंतर चिरलेले टोमॅटो टाकून हळद, तिखट मसाले, धने पावडर, गरम मसाला टाकून परतून घ्या. त्यात शिजवलेली डाळ टाकून एकूण मिश्रण एकत्रित करून परतून घ्या. डाळ थोडी पातळ होण्यासाठी आणि योग्य प्रकारे शिजण्यासाठी त्यात थोडे पाणी ओता आणि मंद आचेवर 15 ते 20 मिनिट डाळ शिजवायला ठेवा.

डाळ शिजवून मऊ झाल्यानंतर एका खोल चमच्यामध्ये थोडे तूप गरम करा त्यात मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची आणि हिंग घ्या आणि ते डाळीवर टाका. डाळीवर चिरलेली कोथिंबीर टाका आणि अशा प्रकारे तुमची ढाबा स्टाइल 'दाल फ्राय' तयार होईल, ही दाल फ्राय तुम्ही गरम गरम भातासोबत आणि रोटीसोबत सर्व्ह करून ढाबा स्टाइल 'दाल फ्राय'चा आस्वाद घेऊ शकता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा