Idli Dhokla Breakfast google
चटकदार

मसालेदार इडली ढोकळा हे नाव एकत्र कधी ऐकल आहे का? जाणून घ्या झटपट मसालेदार इडली ढोकळा कसा बनवायचा

रोज नाश्त्याला आणि मुलांना टिफिनसाठी नवीन काय करायचं हे सुचत नाही. तुम्ही कधी इटली आणि ढोकळा हे नाव एकत्र ऐकलं आहे का? पण आम्ही तुमच्यासाठी 'मसालेदार इडली ढोकळा' असं कॉम्बिनेशन असणारा वेगळा पदार्थ घेऊन आलोय. कमीत कमी वेळात घरच्याघरी बनवा 'मसालेदार इडली ढोकळा'.

Published by : Team Lokshahi

मसालेदार इडली ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

बेसन

तेल

जिरं

मोहरी

कडीपत्ता

इनो

रवा

दही

तिखट मसाले

मीठ

हिंग

साखर

मसालेदार इडली ढोकळा बनवण्याची कृती:

एका बाऊलमध्ये एक कप रवा घेऊन त्यात दही आणि पाणी मिक्स करा. त्यात तिखट मसाले आणि चविनुसार मीठ घालून त्यात चिमुटभर हिंग आणि साखर घाला. त्यात एक चमचा बेसन आणि तेल मिक्स करा. खोलगट चमचा घेऊन त्यात तेल गरम करा. नंतर जिरं, मोहरी, कडीपत्ता घेऊन ती फोडणी रवा आणि दहीच्या मिश्रणात ओतून मिक्स करून त्यात इनो घाला आणि त्यावर 1 तासासाठी झाकण ठेवा.

स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. इडली पात्राला तेल लावा जेणे करून त्याला पदार्थ चिटकणार नाही. नंतर इडली पात्रात मिश्रण ओता आणि स्टीमरमध्ये ठेवून झाकण लावा. १५ मिनिटांसाठी मसालेदार इडली ढोकळा वाफेवर शिजवून घ्या. अशा प्रकारे तुमची खमंग मसालेदार इडली ढोकळा तयार होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा