चटकदार

होळी स्पेशल : पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी बनवायची? रेसिपी वाचा

Published by : Siddhi Naringrekar

होलिका दहनाचा आजचा म्हणजेच ६ तारखेचा मुहूर्त आहे. आज होलिकेची पूजा केली जाते. होळी पेटवून तिची पूजा केली जाते. या दिवशी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर जाणून घेऊया पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी तयार करतात.

पुरणपोळी

चणाडाळ व्यवस्थित धुऊन घ्यावी आणि एक कप चणाडाळ असेल तर त्याच्या अडीचपट पाणी घालून शिजवावीडाळ शिजल्यावर पाणी असेल तर काढून टाकावे याची कटाची आमटी तुम्हाला बनवता येते. एका भांड्यात काढावी त्यात किसलेला गूळ घालावा आणि मंद आचेवर शिजवावी, गूळ आणि चणाडाळ आटू लागेल. ते मध्ये मध्ये ढवळत राहावे अन्यथा खाली भांड्याला लागून करपू शकते.त्यात वेलचीपूड आणि जायफळ पावडर मिक्स करावे. त्यानंतर गरम असतानाच हे पुरण वाटून घ्यावे आणि वाटलेल्या पुरणात डाळ राहात नाही.

नंतर मैदा घ्या आणि त्यात ४-५ चमचे तेल घालून नीट मळून घ्या हे पीठ तुम्ही साधारण पोळ्या करण्याच्या आधी २ ते अडीच तास आधी भिजवा. दोन तासाने केलेल्या पुरणाचे गोळे बनवून घ्या. मैद्याच्या पिठाचा गोळा घ्या आणि त्याची पातळ पारी लाटून त्यात पुरणाचा गोळा भरा आणि हाताने बंद करा आणि मैद्याचे पीठ वापरून पोळी लाटा. यानंतर पोळी भाजपाता एका बाजूला खरपूस भाजल्यावर ती कागदावर घ्यावी आणि मग परतून दुसरी बाजू भाजावी. तूपासोबत आणि दुधाबरोबर खा.

कटाची आमटी

एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात सुक्या खोबऱ्याचे बारीक काप, उभा चिरलेला कांदा, लसूण, आले प्रत्येकी वेगवेगळे भाजून घ्यावे. आता हे भाजून घेतलेले सर्व जिन्नस व कोथिंबीर एका मिक्सरच्या भांड्यात वाटून खोबऱ्याचे वाटप तयार करुन घ्यावे. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, कढीपत्ता व खोबऱ्याचे तयार वाटप घालावे.

या सगळ्या मिश्रणांत हळद, मीठ, लाल मिरची पावडर, गोडा मसाला घालून ४ ते ५ मिनिटे हे मिश्रण व्यवस्थित शिजू द्यावे. त्यानंतर त्यात कट ओतावा, यांसोबतच चिंचेचा कोळ व उकळवून पेस्ट केलेली चणा डाळ घालावी. चवीपुरते मिठ घालावे. आमटी घट्ट वाटल्यास थोडे पाणी वाढवावे. एका उकळीनंतर आमटीची चव पाहावी गरज वाटल्यास कुटलेला मसाला घालून थोडावेळ उकळावे. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?