चटकदार

तेलाचा एक थेंबही न घालता 'असे' बनवा छोले; जाणून घ्या रेसिपी

छोले भटुरे सर्वांनाच आवडतात. पण अनेकदा डाएट पाळणारे लोकांना हे टेन्शन असते की इतके तेल-मसाला खाल्ल्यानंतर तब्येत बिघडू शकते किंवा वजन वाढू शकते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Chole Recipe : छोले भटुरे सर्वांनाच आवडतात. पण अनेकदा डाएट पाळणारे लोकांना हे टेन्शन असते की इतके तेल-मसाला खाल्ल्यानंतर तब्येत बिघडू शकते किंवा वजन वाढू शकते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तेलाशिवाय मसालेदार छोले कसे बनवू शकता आणि तुमची प्रकृतीही उत्तम राहील. त्यामुळे जाणून घ्या नो ऑईल चण्यांची रेसिपी

साहित्य

1 वाटी छोले (रात्रभर भिजवलेले)

2 कप पाणी

1 मोठा कांदा

2 मध्यम आकाराचे टोमॅटो

1 टीस्पून आले लसूण

2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून

1 टीस्पून लाल मिरची पावडर

1 टीस्पून हळद पावडर

1 टीस्पून धने पावडर

1/2 टीस्पून हिंग

1/2 टीस्पून गरम मसाला

1 टीस्पून जिरे

1/2 टीस्पून साखर

चवीनुसार मीठ

1 टीस्पून लिंबाचा रस

कोथिंबीर

कृती

ऑईल फ्रि छोल्यांची भाजी बनवण्यासाठी प्रथम छोले रात्रभर किंवा 8-10 तास भिजत ठेवा. सकाळी तीन ते चार वेळा पाण्याने चांगले धुवावे. नंतर प्रेशर कुकरमध्ये छोले आणि पाणी टाका. आता छोल्यांसोबत संपूर्ण मसाले एका बंडलमध्ये बांधून प्रेशर कुकरमध्ये ठेवा. त्यात आले, लसूण, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, चिमूटभर मीठ आणि बेकिंग सोडा टाकून कुकरचे झाकण ठेवून गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. चार ते पाच शिट्ट्या किंवा चणे चांगले शिजेपर्यंत शिजवा. गॅस बंद करा आणि कुकर उघडेपर्यंत थांबा.

यानंतर आता एका छोट्या कढईत थोडे पाणी घ्या. चहाची पाने घाला आणि चहाची पानांचा रंग आल्यावर गाळून कुकरमध्ये ठेवा आणि गॅसवर ठेवा. तुम्हाला दिसेल की छोल्यांमध्ये कांदा आणि टोमॅटो चांगले मिसळतील आणि त्याची चवही येईल. यावेळी छोले मसाला घालून ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत शिजवा. शिजल्यानंतर त्यातून सुगंध येऊ लागतो तेव्हा शेवटी लिंबू किंवा सुक्या कैरीची पावडर घाला, कसुरी मेथी घाला आणि नंतर गॅस बंद करा. तुम्ही पराठा, पुरी, भात सोबतच खाऊ शकता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा