चटकदार

Poha Cutlet Recipe: दररोज नाश्त्याला कांदेपोहे खाऊन कंटाळा आला असेल तर, घरच्याघरी तयार करा पोह्यांचे कटलेट

नाश्त्यात नेहमी पोहे खाऊन कंटाळला असाल, तर पोह्याला मस्त ट्विस्ट देत, पोहा कटलेट बनवून पहा. चवीला रुचकर लागणारी ही डिश कुरकुरीत आणि आरोग्यदायी आहे.

Published by : Dhanshree Shintre

पोह्यांची कटलेटसाठी लागणारे साहित्य:

1 कप पोहे

2 मध्यम आकाराचे बटाटे

4 टेबलस्पून मटार

2 टेबलस्पून बारीक चिरलेली फरसबी

2 टेबलस्पून किसलेले गाजर

2 टेबलस्पून कोथिंबीर

2 टेबलस्पून सिमला मिरची

2 टेबलस्पून आले लसूण पेस्ट

1 टेबलस्पून धने पावडर

1/2 टेबलस्पून जिरें पावडर

1/2 टेबलस्पून आमचूर पावडर

2 टेबलस्पून मैदा

2 टेबलस्पून कॉर्न फ्लोअर

4 टेबलस्पून ब्रेडक्रम्स

1 टेबलस्पून मीठ

आवश्यकतेनुसार तेल.

पोह्यांची कटलेट बनवण्याची कृती:

पहिल्यांदा पोहे धुवून घ्या आणि ते भिजत घाला. बटाटे शिजवून घ्या आणि भाज्या बारीक चिरुन घ्या. मैदा आणि कॉर्न फ्लोअरची पेस्ट करून घ्या. भाज्यांना सर्व मसाले व मीठ लावून ठेवा. पोहे चांगले मळून घ्या, बटाटे सोलून किसून घ्या.

भाज्या आणि पोहे, बटाटा मिक्स करून घ्या त्याचे लहान गोळे करा. तयार गोळे आवडतील त्या आकारात करून मैदा आणि कॉर्न फ्लोअरच्या मिश्रणात बुडवून ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून घ्या. गॅसवर मध्यम आचेवर तवा ठेवून तेल सोडून सर्व कटलेट्स दोन्ही बाजूनी गोल्डन ब्रावून होईपर्यंत भाजून घ्या. पोहा कटलेट सर्व्ह करायला तयार ब्रेड, सॉस हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा