चटकदार

Kojagiri Purnima 2024 Masala Doodh: अवघ्या काही मिनिटांत करा कोजागिरी स्पेशल मसाला दूध; पाहा "ही" रेसिपी

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खुप महत्वाचे स्थान आहे. अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. तर या कोजागिरीला अवघ्या काही मिनिटांमध्ये करा कोजागिरी स्पेशल मसाला दूध जाणून घ्या रेसिपी...

Published by : Team Lokshahi

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खुप महत्वाचे स्थान आहे. अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 ला साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा असते. या दिवशी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी खीर आणि मसाला दूध केले जाते त्यात मसाला दूध हे फार महत्त्वाचे मानले जाते. तर या कोजागिरीला अवघ्या काही मिनिटांमध्ये करा कोजागिरी स्पेशल मसाला दूध जाणून घ्या रेसिपी...

मसाला दूध बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

दूध

ड्रायफ्रुटस

साखर

हळद

केसर

जायफळ पावडर

खसखस

विलायची पावडर

मसाला दूध बनवण्याची कृती:

सर्वात आधी दूध चांगल्याप्रकारे उकळवून घ्या. त्यात थोडी साखर टाका आणि थोडावेळ उकळवायला ठेवा. यानंतर त्यात ड्रायफ्रुटस छोटे छोटे कापून टाका आणि त्याचसोबत जायफळ पावडर, खसखस, विलायची पावडर हे सर्व टाकून दूध 5 ते 10 मिनिट उकळवायला ठेवा. यानंतर त्यात केशर आणि हळद टाकून पुन्हा त्याला छान उकळी द्या यानंतर दूध उकळल्यानंतर त्याला चंद्राच्या किरणांच्या प्रकाशात ठेवा आणि अखेर कोजागिरी पौर्णिमा साजरी करत असताना आपल्या प्रियजनांसाबत याचा आस्वाद घ्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा