चटकदार

Kojagiri Purnima 2024 Special Kheer: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरच्या घरी बनवा तांदळाची स्वादिष्ट खीर

नुकतीच नवरात्र पार पाडली देवीच्या शक्तीपीठांची महती या नवरात्रोत्सवनिमित्त आपण जाणून घेतली नवरात्री झाल्यानंतर येते ती कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी खीर आणि मसाला दूध केले जाते तुम्ही सुद्धा घरच्याघरी बनवा स्वादिष्ट खीर.

Published by : Team Lokshahi

नुकतीच नवरात्र पार पाडली देवीच्या शक्तीपीठांची महती या नवरात्रोत्सवनिमित्त आपण जाणून घेतली नवरात्री झाल्यानंतर येते ती कोजागिरी पौर्णिमा. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खुप महत्वाचे स्थान आहे. अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 ला साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी खीर आणि मसाला दूध केले जाते तुम्ही सुद्धा घरच्याघरी बनवा स्वादिष्ट खीर.

तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

150 ग्रॅम तांदूळ

दूध

ड्रायफ्रुटस

साखर

केसर

विलायची पावडर

तांदळाची खीर बनवण्याची कृती:

सर्वप्रथम एका भांड्यात दूध उकळवायला ठेवा. यानंतर तांदूळ 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि उकळलेल्या दूधात टाका. यानंतर तांदूळ फुगेपर्यंत आणि शिजेपर्यंत ते ढवळत राहा. यानंतर त्यात साखर टाका आणि ड्रायफ्रुटस छान बारिक कापून घ्या आणि ते देखील तयार होत असलेल्या खीरमध्ये टाका. यानंतर त्यात वेलची पावडर आणि केशर टाका आणि 5 ते 10 मिनिटे मंद आचेवर शिजवा आणि रात्री चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवून आपल्या कुटुंबासह खीरीचा आस्वाद घ्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर