चटकदार

Ganpati Special : बाप्पासाठी बनवा मूग डाळीचे मोदक, वाचा रेसिपी

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत गणपतीला 10 वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात.

Published by : Siddhi Naringrekar

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत गणपतीला 10 वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात. गणेश चतुर्थीचा सण मोदकाशिवाय अपूर्ण मानला जातो. गणेश चतुर्थीला खास बनवण्यासाठी आणि गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही घरीच मूग डाळीचे मोदक सहज बनवू शकता

मूग डाळ मोदक बनवण्यासाठी साहित्य

२ कप मूग डाळ

३ कप तांदळाचे पीठ

50 ग्रॅम गूळ

एक टीस्पून वेलची पावडर

2 चमचे पिठी साखर

एक कप दूध

एक चिमूटभर मीठ

मोदक बनवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

गॅसवर कढईत एक कप पाणी गरम करून त्यात गूळ मिसळून मंद आचेवर ५ मिनिटे शिजवा.

गुळाची चाचणी घट्ट होऊ लागल्यावर त्यात अर्धी वाटी दूध आणि वेलची पूड घालून मंद आचेवर ५ मिनिटे शिजू द्या.

आता या मिश्रणात मूग डाळ आणि एक कप पाणी घालून पॅन झाकून ठेवा. नंतर गॅस मंद करून डाळ शिजू द्यावी. नंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.

दुसऱ्या भांड्यात तांदळाच्या पिठात साखर आणि मीठ मिसळा. अर्धा कप दूध गरम पाण्यात मिसळा आणि त्याच्या मदतीने तांदळाचे मऊ पीठ बनवा.

आता थोडं पीठ घेऊन त्याला गोल आकारात चपटा करून त्यात गूळ-मुगाच्या डाळीचं मिश्रण टाकून पिठात बंद करून मोदकाचा आकार द्या. त्याचप्रमाणे मोदक तयार करुन घ्या.

तयार मोदक स्टीलच्या भांड्यात ठेवा, त्यानंतर कुकरमध्ये पाणी घाला आणि त्यात मोदक असलेले भांडे ठेवून कुकर झाकून घ्या. साधारण १५ मिनिटे मोदक वाफवून घ्या. त्यानंतर ते बाहेर काढून थंड करा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया