चटकदार

Adhik Shravan: श्रावणात खास वाफवलेल्या बेसनापासून बनवा मसालेदार मासवडी

मासवडी हा पदार्थ श्रावण महिन्यात खाल्ला जाणारा पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, मासवडी हा पदार्थ मसाल्यासोबत बनवला जातो तर हा भाकरीसोबत खाल्ला जातो. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मसालेदार आणि झणझणीत मासवडी बनवण्याची रेसिपी.

Published by : Team Lokshahi

मसालेदार मासवडीसाठी लागणारे साहित्य:

बेसन

किसलेले खोबरे

मीठ

तीळ

शेंगदाणे

कांदा

लसूण

मिरची

मसालेदार मासवडी बनवण्याची कृती:

सर्वात आधी तीळ भाजून घ्या. यानंतर भाजलेले तीळ, शेंगदाणे, लसूण चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट करा. हे मिश्रण बाहेर काढून पुन्हा मिक्सरमध्ये मिरची, तीळ, किसलेले खोबरे, जीरे, हळद हे देखील बारीक सारण करून घ्या.

यानंतर एक कढई घ्या आणि त्यात तेल गरम करत ठेवा तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, हिंग, हळद, लसूण पेस्ट परतून घ्या आणि त्यानंतर त्यात थोडे पाणी आणि मसाले मिक्स करा. यानंतर मिश्रणात बेसन घालून घोटा आणि काळजी घ्या की, मिश्रण जास्त पातळ होणार नाही.

यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन त्यावर तयार केलेले मिश्रण गोल आकारात पसरवून घ्या आणि त्याच्यावर आधी तयार केलेले सारण घाला. रोल करून त्याच्या वड्या कापून घ्या. या वड्या तुम्ही तळून किंवा रस्सा बनवून भाकरी किवा रोटीसोबत खाऊ शकता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे असलेल्या केबिनमध्ये उद्धव ठाकरे दाखल

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश