रक्षाबंधनला प्रत्येकाच्या घरी काहीतरी गोड पदार्थ केला जातो. तर आज आम्ही तुम्हाला गोड श्रीखंडाची रेसिपी सांगणार आहोत.
पहिल्यांदा दुधाच्या सायीसोबत दही तयार करा. मग ते 1 लीटर दुधाचे सायीसकट असलेले दही हे सुती कपड्यात वरच्या बाजूला टांगून ठेवा. त्यानंतर या दह्यातील पाणी सुती कपड्यातून बाहेर येयला लागेल आणि आतमध्ये एक घट्ट गोळा तयार होईल.
त्यामध्ये या गोळ्याच्या वजनानुसार त्यात साखर मिसळा आणि हे मिश्रण अधिक घट्ट तयार करा. याला तुम्ही जितकं घट्ट कराल तसा तो चक्का अधिक स्वादिष्ट दही तयार करण्यासाठी मदत करेल. या मिश्रणात वेलची, जायफळ, केशर, सुकामेवा असे मिश्रण टाकून गोड श्रीखंड तयार आहे. जर तुम्हाला आम्रखंड बनवायचे असेल तर आंब्याचे पल्प टाकून आम्रखंड तयार करा.