चटकदार

Dora Cake Recipe : अंड न घालता बनवा चिमुरड्यांच्या आवडीचा डोरा केक

अंड्यांशिवाय बनवा स्वादिष्ट डोरा केक: सोपी रेसिपी

Published by : Shamal Sawant

डोरेमॉन हे सगळ्याच मुलांच्या आवडीचे कार्टून आहे. या कार्टूनमध्ये डोरा केक हा डोरेमॉनचा आवडता आहे आणि त्याचे नाव ऐकून डोरेमॉनच्या आनंदाला सीमा राहत नाही. खरं तर हा केक एक प्रकारचा लहान पॅनकेक आहेत. हा केक पहिल्यांदा टोकियोमध्ये बनवला गेला असल्याचे म्हंटले जाते. त्यात सहसा अंडी वापरली जातात आणि त्यामुळे बरेच लोक ते बनवणे टाळतात, परंतु या लेखात आपण डोरा केक बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊ आणि तीही अंड्यांशिवाय. मुले दिवसातून अनेक वेळा गोड पदार्थ बनवण्याचा आग्रह धरतात. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, जर तुम्हाला काहीतरी वेगळे बनवायचे असेल तर डोरा केक बनवणे ही सर्वोत्तम कल्पना आहे कारण तुमची मुले त्याचे नाव ऐकताच आनंदी होतील.

लागणारे साहित्य

जर तुम्हाला चार लोकांसाठी डोरा केक बनवायचा असेल तर तुम्हाला एक कप मैदा, एक कप दूध, अर्धा कप चॉकलेट, अर्धा कप साखर, एक चमचा बेकिंग पावडर आणि तेवढाच बेकिंग सोडा, एक चमचा बटर, एक कप दूध लागेल. दोन ते तीन थेंब व्हॅनिला एसेन्स आणि एक ते दीड चमचा मिल्क पावडर.

कृती

सर्वप्रथम, पीठ चाळून घ्या आणि त्याच चाळणीत बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर पिठामध्ये मिसळा. यानंतर, एका भांड्यात पिठीसाखर, लोणी, दही, दुधाची पावडर, दूध मिसळा आणि पिठात मिसळा. यानंतर, सर्वकाही चांगले फेटून घ्या आणि व्हॅनिला एसेन्स घातल्यानंतर, पीठ झाकून ठेवा आणि 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवा. आता पॅन गरम करा आणि त्यावर तूप लावा किंवा बटर देखील वापरा. ​​पॅनवर पीठ पसरवा (थोडे जाड ठेवा, चिल्यासारखे पातळ करू नका), झाकण ठेवा आणि मंद आचेवर एक ते दीड मिनिटे शिजवा. जेव्हा ते एका बाजूने सोनेरी रंगाचे होईल तेव्हा ते दुसऱ्या बाजूला उलटा आणि बेक करा. सर्व डोरा केक त्याच प्रकारे तयार करा.

असा सजवा डोरा केक

सर्व डोरा केक्स तयार झाल्यावर, चॉकलेट डबल बॉयलरमध्ये वितळवा. त्यात थोडे बटर घाला आणि चांगले फेटून घ्या आणि नंतर हे मिश्रण डोरा केक्सवर लावा आणि ते एकमेकांवर चिकटवा. अशा प्रकारे तुमचे चविष्ट डोरा केक तयार होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं