चटकदार

जेवणात चव वाढवण्यासाठी बनवा झणझणीत जवसाची चटणी

जेवणात चव वाढण्यासाठी आपण जेवताना सोबत लोणचे घेतो. जेवणात थोडा झणझणीत तडका देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय झणझणीत जवसाची चटणी. ही जवसाची चटणी भाकरी किंवा चपातीसोबत खाल्ली जाऊ शकते.

Published by : Team Lokshahi

जवसाच्या चटणीसाठी लागणारे साहित्य:

जवसाच्या बिया

मीठ

ऑलिव्ह ऑईल

लाल मिरची

जिरे

चिंच

कोथिंबीर

जवसाची चटणी बनवण्याची कृती:

सर्वात आधी जवसाच्या बिया तेलात भाजून घ्या. यानंतर ते बाजूला काढून पॅनमध्ये जिरे परतून घ्या. भाजून घेतलेल्या जवसाच्या बिया, जिरे आणि चिंच मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता यात मीठ आणि लाल मिरची बारीक करून मिक्स करा. आता या मिश्रणात थोडे पाणी ओता आणि हे मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये लावा. आता शेवटी त्यावर कोथिंबीर बारीक करून टाका आणि अशा प्रकारे जवसाची चटणी आंबट आणि झणझणीत चटणी तयार या चटणीचा आस्वाद तुम्ही जेवताना तसेच भाकरी आणि चपातीसोबत घेऊ शकता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा