चटकदार

हिवाळ्यात हेल्दी राहायचे असेल तर ट्राय करा आल्याचा हलवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

थंडीच्या वातावरणात मौसमी आजारांपासून बचाव करण्यासाठी लोक अनेक गोष्टी करतात. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर आल्याचा हलवा नक्की खा.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Ginger Halwa : थंडीच्या वातावरणात मौसमी आजारांपासून बचाव करण्यासाठी लोक अनेक गोष्टी करतात. अनेक औषधांसोबतच आपण आपल्या आहारात उष्ण स्वभावाच्या गोष्टींचा समावेश करतो. यामुळे या हिवाळ्यात तुम्हाला सर्व प्रकारच्या आजारांपासून स्वतःला वाचवायचे असेल आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर आल्याचा हलवा नक्की खा. आले आणि गुळापासून बनवलेली ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मनसोक्त नक्की खातील. चला जाणून घेऊया याची सोपी रेसिपी...

आल्याचा हलवा बनवण्यासाठी साहित्य

किलो आले - 500 ग्रॅम

गूळ - 1 कप

बदाम - 1/२ कप

काजू - १/2 कप

मनुका - 20

तूप - 2 चमचे

अक्रोड - 1/4 कप

आल्याचा हलवा रेसिपी

1. सर्वप्रथम आले सोलून घ्या, चांगले चिरून घ्या आणि ब्लेंडरमधून जाड पेस्ट बनवा.

2. आता ग्राइंडरमध्ये काजू, अक्रोड आणि बदाम टाका आणि एक भरड मिश्रण तयार करा.

3. एक पॅन घ्या आणि तूप गरम करा.

4. तूप गरम झाल्यावर त्यात आल्याचे मिश्रण घालून चांगले मिक्स करा.

5. हे मिश्रण सुमारे 15 मिनिटे ढवळत राहा आणि चांगले तळून घ्या.

6. आता त्यात गूळ घाला, चांगले मिसळा आणि पूर्णपणे वितळू द्या.

7. यानंतर, त्यात मनुका आणि ड्रायफ्रुटस् घाला आणि सुमारे 5 मिनिटे किंवा खीर घट्ट होईपर्यंत शिजवा.

8. हलवा तयार आहे, त्यावर ड्रायफ्रुटने सजवा आणि सर्व्ह करा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा