चटकदार

World Vada Pav Day : स्ट्रीट स्टाईल स्पेशल वडा पावाचा आस्वाद घ्या घरी बसून, जाणून घ्या रेसिपी

तुम्ही स्ट्रीट स्टाईल वडा पाव घरच्या घरी बनवू शकता. चला तर मग आज आम्ही तुम्हाला वडा पाव बनवण्याची पद्धत सांगणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

World Vada Pav Day : आजच्या तारखेत वडा पाव फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. पावसात अनेकदा वडा पाव खाण्याचा मोह होतो. अशात, तुम्ही स्ट्रीट स्टाईल वडा पाव घरच्या घरी बनवू शकता. चला तर मग आज आम्ही तुम्हाला वडा पाव बनवण्याची पद्धत सांगणार आहोत.

साहित्य :

2 उकडलेले बटाटे

4 पाव

1 कप बेसन

2 हिरव्या मिरच्या

1 टीस्पून आले-लसूण पेस्ट

1/4 टीस्पून हळद पावडर

1 टीस्पून मोहरी

8-10 कढीपत्ता

एक चिमूटभर बेकिंग सोडा

चवीनुसार हिरवी चटणी

चवीनुसार कोरडी लाल चटणी

चवीनुसार मीठ

आवश्यकतेनुसार तेल

कृती :

सर्वप्रथम एका कढईत मध्यम आचेवर तेल टाकून गरम करण्यासाठी ठेवा.

त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाका आणि फोडणी द्या.

आता बटाटे मॅश करून त्यात टाका.

हळद पावडर आणि मीठ एकत्र करून २ मिनिटे शिजवा, नंतर गॅस बंद करा. वड्याचे मिश्रण तयार आहे.

एका भांड्यात बेसन, मीठ, खाण्याचा सोडा आणि पाणी घालून घट्ट पीठ तयार करा.

कढईत तेल मध्यम आचेवर ठेवून गरम करण्यासाठी ठेवावे.

आता मिश्रणाचा थोडासा भाग घ्या, त्याला गोळ्यांचा आकार द्या आणि बेसनमध्ये बुडवा, नंतर तेलात घाला.

सर्व वडे त्याच प्रकारे सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या आणि एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा.

पावाच्या मधोमध काप करून त्यावर कोरडी लाल चटणी टाका, नंतर वडा ठेवून वरती थोडी कोरडी लाल चटणी टाकल्यावर पाव झाकून ठेवा.

वडा पाव तयार आहे. तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा