इतर

भाजलेल्या टोमॅटोची तंदूरी चटणी काही मिनिटांत तयार होईल, वाचा रेसिपी

Published by : Siddhi Naringrekar

तुम्हालाही जेवणासोबत वेगवेगळ्या प्रकारची चटणी खाण्याचे शौक असेल तर यावेळी रोस्टेड टोमॅटोची चटणी नक्की करून पहा. या टोमॅटो तंदुरी चटणीची मसालेदार चव चाखणाऱ्या व्यक्तीला ती पुन्हा पुन्हा खायला आवडते. या चटणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही चटणी कमी वेळात तयार होते. चला तर मग जाणून घेऊया भाजलेल्या टोमॅटोची ही चविष्ट चटणी कशी बनवायची.

भाजलेले टोमॅटो चटणी बनवण्यासाठी साहित्य-

- दोन चमचे तेल

- दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो

- लसुणाच्या पाकळ्या

- सुकी लाल मिरची

- चवीनुसार मीठ

- कढीपत्ता

- जिरे

- राई

आले-लसूण पेस्ट

- लहान कांदा

रोस्टेड टोमॅटो चटणी बनवण्यासाठी प्रथम टोमॅटो भाजून घ्या. त्यासाठी आधी टोमॅटो स्वच्छ धुवून स्वच्छ करा आणि नंतर गॅसवर गॅसवर ठेवून शिजवा. टोमॅटो गॅसवर ठेवून तोपर्यंत परतून घ्या. जोपर्यंत ते मऊ होत नाही आणि त्याची साल निघत नाही. टोमॅटो चांगले शिजल्यावर एका भांड्यात ठेवून चांगले मॅश करा.

आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे तडतडून घ्या. मोहरी आणि कढीपत्ता एकत्र घालून तळून घ्या. लसूण आणि आले एकत्र घालून परतून घ्या. ते सोनेरी होऊ लागल्यावर त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून परता. मऊ झाल्यावर त्यात टोमॅटो, मीठ घालून चांगले परतून घ्या. तुमची चवदार आणि मसालेदार तंदूरी टोमॅटो चटणी तयार आहे.

Sanjay Raut : फडणवीस लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करु शकत नाहीत

Sanjay Raut : निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा ?

किरण सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

उज्जवल निकम आज राज ठाकरे यांची भेट घेणार

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'