आजकाल मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्यक्ती लहान असो किंवा वयस्कर सगळ्यांनाच स्क्रीन स्क्रोल करण्याची सवय लागली आहे. पण मोबाईलच्या अतीवापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांवर होणारा परिणाम. अनेक अभ्यासकांनी मोबाइलच्या वापराचे कोणते आणि कसे दुष्परिणाम होतात हे सांगितले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अधिक काळ जर फोनचा वापर केला तर ड्राय आय सिंड्रोम, मायोपिया, डोकेदुखी, झोपेशी निगडीत समस्या, तिरळेपणा अशा अनेक समस्या येऊ शकतात. अधिक काळ व्यक्ती रील्स बघत असेल तर डोळ्यांच्या पापण्या खूप कमी प्रमाणात मिटल्या जातात. अभ्यासकांच्या मते, रील्स बघताना पापण्या अधिक काळ मिटत नाहीत. त्यामुळे डोळे अधिक शुष्क होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
मायोपियाचा वाढता धोका :
मोबाईच्या अधिक वापरामुळे मायोपियाचा धोका वाढू शकतो. यामुळे डिजिटल आय स्ट्रेन, तिरळेपणा आणि कमजोर नजर आशा समस्या वाढू शकतात.
डोळ्यासंबंधित धोके टाळण्यासाठी काय करावे?
20-20-20 नियम पाळा म्हणजेच 20 मिनिटे, 20 सेकंदासाठी 20 फुट लांब राहा
डोळे मिचकावण्याची सवय लावा – स्क्रीनकडे पाहताना वारंवार डोळे मिचकावण्याचा प्रयत्न करा.
ब्लू लाईट फिल्टर लावा- मोबाईल आणि लॅपटॉपवर नाईट मोड किंवा ब्लू लाईट फिल्टर चालू करा.
स्क्रीन टाइम कमी करा- दिवसभरात 1-2 तासांचा डिजिटल ब्रेक घ्या.
डोळ्यातील थेंब वापरा- डोळ्यांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आय ड्रॉप्स घ्या.