प्रत्येक स्वयंपाकघरात कांद्याचा (Onion) हमखास वापरला जातो. तसेच कांद्याशिवाय जेवण अपूर्ण वाटते. काद्यांची पात आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कांद्याची पात (Spring Onion) खायला चवदार असते तेवढीच त्यामध्ये पौष्टिक तत्वेही आहेत. जर तुम्ही तुमच्या आहारात कांद्याच्या पातीचा समावेश केला तर त्याचा तुम्हाला फायदाच होऊल. कांद्याच्या पातीमध्ये कार्बोहाइड्रेट्स, विटामिन सी, प्रोटीन, कॅल्शियम असे घटक असतात. काद्यांची पात खाल्लाने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.
कांद्याची पात खाल्लाने तोंडातून येणारा वास कमी होतो. तसेच अॅसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत होते. आपल्या पोटात जळजळ होत असेल तर कांद्याची पात खावी ज्यामुळे आपल्या पोटाला आराम मिळतो. कांद्याची पात आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवते.
रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी कांद्याच्या पातीचे ओनियन्स सल्फर असल्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरते. सल्फर संयुगे शरीरात इन्सुलिन तयार करण्याची क्षमता वाढवतात.
कांद्याची पातीमध्ये जास्त फायबरचे प्रमाण असल्यामुळे पचन सुधारते आणि पचन होण्यास मदत होते. कांद्याच्या पातीची भाजी करून खावे असे काही नाही तुम्ही कांद्याची पात कच्चीही खाऊ शकतो.
कांद्याच्या पातीचा रस केसांना लावल्याने केस फुटणे, पांढरे होणे या संबंधित समस्या दूर होतात. तसेच पांढरा कांदा केसांच्या वाढीसाठी चांगला आहे आणि त्याचा रस डोक्याला लावल्याने केस गळण्याची समस्या कमी होते.