इतर

PM Kisan Yojana; कधी मिळणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता? जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी वाचा.

Published by : shweta walge

सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. करोडो शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा हप्ता नेमक्या कोणत्या तारखेला मिळणार याची मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक उत्तम योजना राबवत आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना देखील यापैकी एक आहे. ही योजना भारत सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे. देशातील गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते देण्यात आहेत. आता 19 वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.

PM किसानचा हप्ता कसा चेक कराल?

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

‘लाभार्थी स्थिती’ मुख्यपृष्ठावर जा, येथे लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा.

तुमचा तपशील एंटर करा, ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक समाविष्ट आहे.

तपशील सबमिट केल्यानंतर, वेबसाइटवर तुमची हप्त्याची स्थिती दिसेल.

PM किसान योजनेसाठी कसा कराल अर्ज?

सर्वप्रथम पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा

विचारलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील जसे की आधार क्रमांक, राज्य, जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँक माहिती प्रविष्ट करा.

फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट घ्या.

PM किसान योजनेशी मोबाईल नंबर लिंक करा

तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जा. म्हणजे CSC किंवा https://pmkisan.gov.in/ वर लॉग इन करा.

'अपडेट मोबाइल नंबर' पर्याय निवडा.

शेतकरी बांधवांनो तुमचा मोबाईल नंबर दिल्यानंतर नोंदणीकृत आधार क्रमांक टाका आणि नवीन मोबाईल नंबर द्या.

यानंतर पडताळणीसाठी विनंती सबमिट करा.

अशा प्रकारे लाभार्थी त्यांच्या हप्त्याची स्थिती जाणून घेऊ शकतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा